- September 23, 2022
- No Comment
कोरेगाव पार्क:जबरदस्तिने तरुणीवर लैंगिक अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
कोरेगाव पार्क: ब्रेकअप झाल्यानंतरही तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याला प्रेम संबंधाबाबत सांगण्याची धमकी देऊन भेटण्यासाठी बोलावून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षिद टांक (वय 27, खांडवा, मध्यप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी 28 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि हर्षदचे 2017 पासून दीड वर्ष प्रेम संबंध होते. मात्र काही कारणास्तव त्यांच्यात ब्रेक-अप झाले. तरीही मागील एक वर्षापासून आरोपी वारंवार फिर्यादीला भेटण्यासाठी बोलावत होता. फिर्यादीने त्याला नकार दिला असता फिर्यादीच्या घरच्यांना आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्या प्रेमसंबंधाबाबत सांगेल अशी धमकी दिली होती.
त्यामुळे इच्छा नसतानाही फिर्यादी तरुणी त्याला भेटण्यासाठी कोरेगाव पार्क परिसरात गेली होती. यावेळी या परिसरातील एका हॉटेलमध्ये आरोपीने फिर्यादीला अडकून ठेवले आणि तिच्यावर इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. फिर्यादीने याला विरोध केला असता तिला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.