घराचे कुलुप तोडून बत्तीस हजारांचे दागीने लंपास, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
- क्राईम
- September 10, 2022
- No Comment
वाकड: वाकड येथे बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचांदीच दागिने चोरून नेले आहेत. ही घटना कस्पटेवस्ती येथे झाली आहे.
प्रवीणकुमार कृष्णा कांबळे (वय 38, रा. कस्पटेवस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर मंगळवारी (दि. 6) दुपारी अडीच ते गुरुवारी (दि. 8) सायंकाळी साडेपाच वाजता च्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. घरातून 32 हजार 600 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली.
पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.