पिंपरी:अनिल जाधव टोळीवर मोक्का,पिंपरी-चिंचवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
- क्राईम
- September 11, 2022
- No Comment
पिंपरी: पिंपरी येथील सराईत गुन्हेगार अनिल जाधव टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) कारवाई केली.
मंगळवारी (दि. 6) अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. टोळी प्रमुख अनिल ऊर्फ संतोष ऊर्फ अन्या गोरख जाधव (30, रा. कुदळवाडी, चिखली), सूरज ऊर्फ बंट्या दत्तू गायकवाड (22, रा. फुरसुंगी, हडपसर), सज्जाद रियाज शेख (19, रा. चिंचवड), सुप्रीम राजू काळे (रा. चिंचवड), विनायक क्षीरसागर (रा. चिंचवड), नीलेश हेळवार (रा. चिंचवड), नाईंटी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.