• September 17, 2022
  • No Comment

पुर्व वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार, चार टोळक्यांवर गुन्हा दाखल

पुर्व वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार, चार टोळक्यांवर गुन्हा दाखल

पिंपरी: पिंपरी येथील गुरुनानक मार्केटमध्ये एका तरुणावर तीन ते चार जणाच्या टोळीने कोयत्याने वार करत परिसरात दहशत पसरवली.

याप्रकरणी विकास बिहारी राम (वय 21 रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पी.डी. उर्फ प्रेम डोंगरे (वय18 पत्ता माहिती नाही) व त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गुरुनानक मार्केट मधील एका चप्पलच्या दुकानात काम करतात. बुधवारी ग्राहकासाठी गोडाऊनमधून चप्पल आणत असताना फिर्यादी यांच्या तोंड ओळखीचा इसम प्रेम डोंगरे हा त्याच्या साथीदारासोबत तेथे आला. त्याने फिर्यादीला अडवून जुन्या भांडणाच्या रागातून फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र फिर्यादी यांनी तो चुकवला असता त्यांच्या डोक्याला कोयता घातला.

त्यानंतर आरोपींनी तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला मात्र फिर्यादीने दोनवेळा तो ही वार चुकवला. यावेळी कोणी आडवे आले तर त्याला आडवा करेन अशी धमकी देत आरोपींनी परिसरातील गाड्यांवरही तलवार व कोयत्याने मारून गाड्यांचे नुकसान केले. परिसरात गोंधळ घालून दहशत पसरवली. यावेळी परिसरातील दुकानदारांनी भितीने दुकानांचे शटरबंद करून घतले होते. यावेळी हातत कोयता व तलवार फिरवून आरडा-ओरड करत तेथून ते निघून गेले. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *