- September 17, 2022
- No Comment
घराचे सगळे पैसे घेऊन सेलडीड नाही, आरोपी महिले विरुद्ध गुन्हा दाखल
वाकड: फ्लॅट विक्री करत असताना संपूर्ण पैसे घेऊनही केवळ सेल अग्रीमेंट करून सेलडीड न करून देता ग्राहकांची फसणूक केल्या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकार 26 मार्च 2021 ते 15 सप्टेंबर 2022 या कालावधीत घडला आहे.
आरोपी महिले विरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.15) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी देलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपी महिलेकडून डांगे चौक येथील साई कृष्ण पार्क येथील द्वारका पार्क सोसायटीमध्ये 28 लाख 50 हजार रुपयांना फ्लॅट विकत घेतला होता. त्याचे पूर्ण पैसे पाठवूनही आरोपी महिलेने केवळ फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून अग्रीमेंट टू सेल करून दिले मात्र आज अखेर सेलडीड प्रमाणपत्र न देता फिर्यादी महिलेचा फसवणूक केली आहे. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.