- September 17, 2022
- No Comment
महिले वर वारंवार लैंगिक अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
दिघी: महिलेला इमोशनल ब्लॅकमेल करून महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला.हा प्रकार मार्च 2020 ते 16 सप्टेंबर 2022 या कालावधीत खडी मशीन रोड, दिघी येथे घडली.
आकाश अनिल मिसाळ (वय 22, रा. धावडेवस्ती, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची दररोज होणाऱ्या भेटीतून ओळख झाली. त्यानंतर आरोपीने महिलेला इमोशनल ब्लॅकमेल करून तिचा वारंवार पाठलाग केला. महिलेची मैत्री करून त्यांना खडी मशीन रोडवरील एका लॉजवर नेले आणि जबरदस्तीने त्यांच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कुणाला सांगितला तर फिर्यादी महिला आणि तिच्या घरच्यांना जगू देणार नाही, असे म्हणत हाताने मारहाण करून शिवीगाळ केली.
पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.