- September 17, 2022
- No Comment
धनकवडी: तोतया पोलीस गजाआड
धनकवडी: विद्यार्थ्याला धमकी देऊन पोलीस अधिकारी असल्याचे सांगून त्याची फसवणूक करणाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा तीन च्या तपासी पथकाने केली आहे.
शुभम माने (वय 22 रा.धनकवडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस असल्याचे सांगून विद्यार्थ्याला धमकी देत लुबाडणाऱ्या आरोपीचा शोध सिंहगड पोलीस घेत होते, दरम्यान गुन्हे शाखा तीनच्या पोलिसांना संबंधीत संशयीत आरोपी वापरत असलेली गाडी MH-12 NS1871 ही धनकवडी येथील असल्याचे पोलीस तपासात समोर आले. पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता आरोपी गाडीवरून जाताना दिसला. पेलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. सबंधीत गाडी ही एका महिलेच्या नावावर असून पोलिसांनी तपासासाठी ती गाडी जप्त केली आहे. हा तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.