- September 16, 2022
- No Comment
वादातून टोळक्यांचा दुकानदारावर हल्ला दुकानाची तोडफोड
पाषाण: वादातून टोळक्याने दुकानदारावर शस्त्राने वार करुन दहशत माजविल्याची घटना पाषाण भागात घडली. टोळक्याने झेरॅाक्स दुकानातील संगणक तसेच साहित्याची तोडफोड केली. या प्रकरणी 12 ते 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत संदीप विलासराव तुपे रा. सूस रस्ता, बालाजी चौक, पाषाण यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी राज मानवतकर /किशोर गोपी मेघावत नितीन उर्फ बया मेघावत नितीन वैद्य रा. सर्व लमाण तांडा, पाषाण यांच्यासह सहा ते आठ जणांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्य सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली