- September 16, 2022
- No Comment
लोनॲप बंदीची सायबर पोलिसांची मागणी
लोन अॕप द्वारे फसवणूक आणि बदनामीचे प्रकार वाढल्याने; तसेच ‘लोनअॕप मुळे आत्महत्या आणि खुनासारखे गंभीर घडत असल्याने लोनअॕपवर बंदी घालण्याचा प्रस्ताव सायबर पोलिसांच्या वतीने तयार करण्यात आला आहे. प्लेस्टोअरवरील लोनअॕपबाबत तक्रार आल्यानंतर गुगल कंपनीला माहिती कळवून ही ॲप काढून टाकण्यात येणार आहेत.कर्जाचे हप्ते भरले नाहीत किंवा अनेकदा कर्ज फिटल्यानंतरही कंपनीकडून सतत संदेश पाठवण्य़ात येतात. मोबाइलमध्ये सेव्ह असलेल्या इतर क्रमांकावर संबंधित व्यक्तीची माहिती पाठवली जाते. संपर्क यादीतील लोकांना संदेश पाठवून कर्जाची रक्कम भरायला सांगा, असे बजावले जाते. मोबाइलमधील खासगी माहितीचा वापर करण्याची परवानगी दिल्याने छायाचित्रांचा वापर करून बदनामी करण्याचेही प्रकार घडले आहेत. बदनामीच्या भीतीने अनेक तक्रारी पुढे येत नसल्याने पोलिसांच्या तक्रारी वाढल्या आहेत. आर्थिक अडचण असली, तरी लोनअॕपचा वापर टाळा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे