• February 22, 2024
  • No Comment

एकमेकांसोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एकमेकांसोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

    पुणे : एकमेकांसोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून मुलगी सहा आठवड्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या दरम्यान पीडित मुलीच्या घरात घडला आहे.

    याबाबत हडपसर येथे राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने मंगळवारी (दि.20) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन यश सोमनाथ पवार Yash Somnath Pawar (वय-22 रा. फुरसुंगी, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 376, 376/2/एन, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे.

    सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या
    ओळखीचे आहेत. आरोपीने दोघांचे एकमेकांसोबत फोटो काढले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची
    धमकी देऊन वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कोणाला काही सांगितले तर घरच्यांना जीवे मारण्याची धमकी आरोपीने पीडित मुलीला दिली. घाबरलेल्या मुलीने याबाबत कोणाला काहीएक सांगितले नाही. दरम्यान, पीडित मुलगी सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे तिच्या आजोळी गेली होती. त्याठिकाणी तिला त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी मुलगी सहा आठवड्यांची गरोदर असल्याचे समोर आले.
    याबाबत हडपसर येथे राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने मंगळवारी (दि.20) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन यश सोमनाथ पवार (वय-22 रा. फुरसुंगी, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 376, 376/2/एन, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे.

    सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या
    ओळखीचे आहेत. आरोपीने दोघांचे एकमेकांसोबत फोटो काढले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची
    धमकी देऊन वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत कोणाला काही सांगितले तर घरच्यांना जीवे मारण्याची धमकी आरोपीने पीडित मुलीला दिली. घाबरलेल्या मुलीने याबाबत कोणाला काहीएक सांगितले नाही. दरम्यान, पीडित मुलगी सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे तिच्या आजोळी गेली होती. त्याठिकाणी तिला त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी मुलगी सहा आठवड्यांची गरोदर असल्याचे समोर आले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *