• February 22, 2024
  • No Comment

जागेच्या वादातून तरुणाचा खून; धायरी येथील घटना

जागेच्या वादातून तरुणाचा खून;  धायरी येथील घटना

    पुणे: सिंहगड रस्ता परिसरातील रायकर मळा येथे जागेच्या वादातून एका तरुणाचा निघृणपणे खून करण्यात आला आहे. आदित्य उर्फ राजू जनार्दन पोकळे (वय:१९, रा. खंडोबाचा माळ, रायकर मळा, धायरी, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत संपत तानाजी काळोखे व सागर पोपट रायकर या दोघाविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

    याबाबत मिळालेली माहिती अशी की, आदित्य पोकळे व संपत काळोखे हे नातेवाईक आहेत. त्यांच्यात जागेवरून वाद आहे. दरम्यान मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आदित्य हा सदर वादग्रस्त जागेवर कामगारांसह पत्रा शेडचे काम करीत होता. त्यावेळी संपत काळोखे व सागर रायकर हे दोघे त्या ठिकाणी आले. यावेळी आदित्य व संपत यांच्यात वाद झाले. त्यानंतर दोघांनी आदित्यच्या पाठीत धारदार हत्याराने वार केले. यामध्ये आदित्यचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार आदींनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना केल्या. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *