• February 22, 2024
  • No Comment

पुणे पोलिसांकडून सांगली मधून १० किलो एमडी मिठाच्या पाकिटातून जप्त

पुणे पोलिसांकडून सांगली मधून १० किलो एमडी मिठाच्या पाकिटातून जप्त

    पुणे : पुणे शहर पोलिस दलाने गेल्या दोन दिवसात विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्ली येथे केलेल्या कारवाई करुन तब्बल २ हजार २०० कोटी रुपयांचे ११०० किलोपेक्षा अधिक एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर सांगलीत पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल १० किलो एमडी मिठाच्या पाकिटातून जप्त करण्यात आले आहे. सांगलीतून कुरिअरद्वारे पुढे पाठवण्यात येणार होते. अजून ५० किलो एमडी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    कुरकुंभ एमआयडीसीमधील अर्थकेम कारखान्यावर छापा मारून जवळपास ६०० किलोपेक्षा अधिक एम डी जप्त केले होते. पोलिसांनी कंपनी मालक साबळे आणि त्याच्यासाठी एम.डी.चा फॉर्म्युला तयार करणाऱ्या केमिकल इंजिनिअरला ताब्यात घेतले आहे. दरम्यान कंपनीतून पुणे शहर, दिल्ली, मुंबई, मिरा-भाईंदर, बंगलोर आणि हैद्राबाद अशा मेट्रोसिटीत एमडीची पुरवाठा झाल्याचे लक्षात आल्याने अनेक राज्यात पथके रवाना झाली आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *