• February 22, 2024
  • No Comment

बलात्काराची तक्रार मागे न घेतल्याने तरुणीला व तिच्या भाऊ, बहिणीला चाकूचा धाक दाखवून मारहाण

बलात्काराची तक्रार मागे न घेतल्याने तरुणीला व तिच्या भाऊ, बहिणीला चाकूचा धाक दाखवून मारहाण

    पुणे : बलात्काराची तक्रार मागे न घेतल्याने तरुणीच्या घरात शिरून टोळक्याने तिचा भाऊ, बहिणीला चाकूचा धाक दाखवून मारहाण केल्याची घटना लष्कर भागात घडली. तरूणीसह तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

    अलसबा जावेद शेख, जावेद शेख, आयान शेख, सलीम शेख, अल्फेज शेख यांच्यासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अलसबा शेखच्या भावाविरोधात तरुणीने बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार दिली होती. तरुणीने तक्रार मागे न घेतल्याने आरोपी तरुणीवर चिडले होते. त्यानंतर आरोपी शेख तरुणीच्या घरात शिरले. तिची लहान बहीण, दोन भावांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी तरुणीच्या लहान बहिणीवर चाकू उगारून तिला धमकावले. बलात्काराची तक्रार मागे न घेतल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारू, अशी धमकी आरोपींनी दिली. घाबरलेल्या तरुणीने लष्कर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनीषा वलसे करत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *