• February 21, 2024
  • No Comment

पुणे शहरात लोणीकंद परिसरात चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला उंदीर मारण्याचे औषध पाजले, पतीला अटक

पुणे शहरात लोणीकंद परिसरात चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला उंदीर मारण्याचे औषध पाजले, पतीला अटक

    पुणे :  पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. तसेच तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने उंदीर मारण्याचे विषारी औषध पाजले. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील केसनंद गावच्या हद्दीत 18 फेब्रुवारी रोजी सकाळी आठच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पती, सासू-सासरे,दीर, ननंद, पतीचा मामा यांच्यावर गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे.
    याबाबत 23 वर्षीय विवाहित महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पती हनुमंत अंकूश गिरी, सासू सरस्वती अंकूश गिरी, सासरे अंकूश रामभाऊ गिरी (रा. सुलतापूर, जि. बीड), दिर आदित्य अंकूश गिरी, ननंद सुजाता प्रल्हाद भारती, पतीचा मामा शिवाजी भारती (सर्व रा. मु.पो. सोन्ना ता. वडवणी,
    जि. बीड) यांच्यावर आयपीसी 307, 328, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन पती हनुमंत गिरी याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे आरोपी हनुमंत गिरी याच्यासोबत सप्टेंबर 2018 मध्ये लग्न झाले आहे. महिला तिच्या सासरी नांदत असताना आरोपींनी मानसिक व शारीरिक त्रास दिला. तसेच आरोपी पतीने कोणत्या ना कोणत्या कारणावरुन महिलेला हाताने मारहाण केली.तर इतर आरोपींनी महिलेच्या चारित्र्यावर संशय घेतला. रविवारी सकाळी आठच्या सुमारास सासरच्या लोकांनी महिलेचे हातपाय पकडले. यानंतर पतीने महिलेला जीवे मारण्याच्या उद्देशाने उंदीर मारण्याचे विषारी औषध पाण्यात मिसळून ते पाणी बळजबरीने पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भालेराव करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *