• February 20, 2024
  • No Comment

कोथरूडमधील भुसारी कॉलनीमध्ये ‘डीआरडीओ’च्या शेजारी असलेल्या इमारतीच्या खिडक्यांमध्ये बंदुकीमधून झाडलेल्या गोळ्या अडकल्याचे प्रकरण समोर

कोथरूडमधील भुसारी कॉलनीमध्ये ‘डीआरडीओ’च्या शेजारी असलेल्या इमारतीच्या खिडक्यांमध्ये बंदुकीमधून झाडलेल्या गोळ्या अडकल्याचे प्रकरण समोर

    पुणे : कोथरूडमधील भुसारी कॉलनीमध्ये ‘डीआरडीओ’च्या शेजारी असलेल्या इमारतीच्या खिडक्यांमध्ये बंदुकीमधून झाडलेल्या गोळ्या अडकल्याचे प्रकरण समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या फॉरेन्सिक तपासणी पथकाने देखील याठिकाणी तपासणी केली असून नेमकी काय घटना घडली असावी याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
    परीमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसारी कॉलनीमध्ये गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कोथरूड पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी तपासणी केली असता एका सदानिकेच्या खिडकीच्या काचेमध्ये गोळी अडकल्याचे निदर्शनास आले. ही गोळी ‘डीआरडीओ’च्या फायरिंग रेंजमधून आलेली असावा असा अंदाज आहे. पुढील तपास सुरू असल्याचे कदम म्हणाले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *