- February 20, 2024
- No Comment
भारती विद्यापीठ पोलिसांकडून रेकॉर्डवरील आरोपी गजाआड
पुणे : कात्रज परिसरातील सोपानकाका नगर येथील मंगलम सोसायटीमध्ये भरदिवसा पाच फ्लॅटमध्ये घरफोडी झाल्याची घटना 6 फेब्रुवारी रोजी दुपारी पावणे तीन ते चारच्या दरम्यान घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक करुन पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याच्याकडून गुन्ह्यातील 1 लाख 27 हजार रुपये किमतीचे 56 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले आहेत.
सुदर्शन विष्णुपंत चंद्रपाटले (वय-30 रा. दिग्विजय कॉलनी, ता. मावळ मुल रा. मु.पो. वडगळ नागनाथ, ता. चाकुर जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मारुती विष्णू थिटे (वय-59 रा. फ्लॅट नं. 506 फेज नं. 1, मंगलम सोसायटी, सोपानकाका नगर, गुजरवाडी रोड, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील हिस्ट्रीशीटर असून त्याच्यावर घरफोडीचे 35 गुन्हे दाखल आहेत.
गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने घटनास्थळ तसेच आजु बाजुच्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.
त्यावेळी एक संशयित घटनास्थळावर दिसून आला.
सीसीटीव्ही मध्ये दिसून आलेल्या आरोपीचा पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे यांनी
घटनास्थळ खोपडेनगर या ठिकाणापासुन राजगुरुनगर, खेड, लोणावळा व वडगाव मावळ या ठिकाणचे 300 सीसीटीव्ही
कॅमेरे तपासले. त्यावेळी आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार आरोपीचा वडगाव मावळ येथे शोध घेऊन त्याला
अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला. आरोपीकडून भारती विद्यापीठ, हडपसर,
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.