• February 20, 2024
  • No Comment

मोबाईल जबरदस्तीने हिसकावून जबरी चोरी करणारी टोळी शिवाजीनगर पोलिसांकडून गजाआड

मोबाईल  जबरदस्तीने हिसकावून जबरी चोरी करणारी  टोळी शिवाजीनगर पोलिसांकडून गजाआड

    पुणे : रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून जबरी चोरी केल्याची घटना शिवाजीनगर परिसरात 14 फेब्रुवारी रोजी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील दोन आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. तर दोन अल्पयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मनपा येथील ब्रिजखाली करण्यात आली.
    चंदु नंदू सरोदे (वय-19 रा. राज चौक, भिम ज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा), सिद्धेश विश्वास शेंडगे (वय-18 रा. सेवक चौक, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) यांना अटक केली आहे. तर त्यांच्यासोबत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तक्रारदार हे 14 फेब्रुवारी रोजी पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी दोन दुचाकीवरुन आलेल्या चार जणांनी तक्रारदार यांचा मोबाईल हिसकावून नेला होता. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयपीसी 392,34 सह आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

    गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या एका दुचाकी तिच्यावरील खुणे मुळे निश्चित केली. तसेच पोलीस अंमलदार प्रविण धडस, सुदाम तायडे, रुपेश वाघमारे यांना माहिती मिळाली की आरोपी मनपा येथील ब्रिजखाली येणार आहेत. पथकाने सापळा रचला असता आरोपी सीसीटीव्ही मध्ये दिसत असलेल्या दुचाकीवरुन त्याठिकाणी आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल, दोन कोयते, दोन दुचाकी असा एकूण एक लाख 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *