• February 20, 2024
  • No Comment

शिवीगाळ करताना हटकले म्हणून तरुणाला हातोडीने व स्क्रू ड्रायव्हरने मारले

शिवीगाळ करताना हटकले म्हणून तरुणाला हातोडीने व स्क्रू ड्रायव्हरने मारले

    पिंपरी : शिवीगाळ करताना हटकले म्हणून तरुणाला हातोडीने व स्क्रू ड्रायव्हरने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि.१९) दत्तनगर, थेरगाव येथे घडली. याप्रकरणी आनंद तुकाराम चव्हाण (वय ३२ रा.थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहुल शेऊ पवार (३३ रा.थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या गाडीचे पंक्चर काढण्यासाठी टायर्सच्या दुकानात गेले होते. यावेळी आरोपी देखील त्याचा छोटा टॅम्पो घेऊन आला. यावेळी त्याने तेथील कामगाराला हवा बघ म्हणत शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादी यांनी शिवीगाळ का करतोस, असे विचारले असता याचा राग येऊन आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत पंक्चरच्या दुकानातील हातोड्याने व स्क्रू ड्रायवरने मारहाण करत जखमी केले.

    Related post

    मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

    मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : मार्केट यार्डमधील फळ, भाजीपाला, केळी, पान तसेच कांदा-बटाटा विभागातील आडत्यांची शिखर संघटना असलेल्या श्री छत्रपती…
    गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने त्रस्त बाजार

    गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पूणे : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत असल्याने नागरिक, व्यापारी आणि शेतकरी यांना मोठ्या…
    महंमदवाडीत टँकरने दुचाकीला दिली धडक; १९ वर्षीय खेळाडू ठार

    महंमदवाडीत टँकरने दुचाकीला दिली धडक; १९ वर्षीय खेळाडू ठार

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे – भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका तरुण फुटबॉलपटूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *