- February 20, 2024
- No Comment
पुणे शहरा पाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये 16 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे शहरा पाठोपाठ आता पिंपरी- चिंचवडमध्ये लाखो रुपयांच मेफेड्रोन ड्रग्स जप्त करण्यात आलंय, पिंपरी- चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केलीय, मध्यरात्री जुना पुणे- मुंबई महामार्गावर या ड्रग्स ची तस्करी सुरू होती. शहजाद आलाम अब्बास कुरेशीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पैकी 5 लाख 40 हजारांचे मेफेड्रोन ड्रग्स आढळेत. आरोपी विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात मागील काही दिवसांत ड्रग्स तस्करीचं प्रमाणत चांगलंच वाढलं आहे. ड्रग्स तस्करांना अटक करुन शिक्षा जरी केली तर त्यांचं रॅकेट मात्र सुरु आहे. पुणे पोलीस हे रॅकेट उद्ध्वस्त करुन शेवटच्या तस्करांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणातदेखील अनेक धागेदोरे पुढे येण्याची दाट शक्यता आहे. ड्रग्स मुंबई आणि परदेशी पाठवण्यात येणार असल्यानं हे आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट नेमकं कुठंपर्यंत पसरलं आहे?, याची पोलीस सखोल चौकशी करत आहे. एक एका आरोपीकडून सगळी माहिती घेतली जात आहे