• February 20, 2024
  • No Comment

कुरकुंभ MIDC मध्ये ११०० कोटींचं ड्रग्स जप्त, आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

कुरकुंभ MIDC मध्ये ११०० कोटींचं ड्रग्स जप्त, आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

    पुणे : शहर ड्रग्सच्या विळख्यात सापडलं आहे. पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत 52 किलो पेक्षा आधिक मेफेड्रॉन मिळून आला आहे. त्यातच आता पुण्यातील ड्रग्स विक्रीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आलं आहे त्यानंतर आता दौंड एमडी ड्रग्सचे कनेक्शन कुरकुंभ एमआयडीत आढळले आहेत. पुणे शहर पोलिसांचा 10 गाड्यांचा ताफा घेऊन MIDC मध्ये छापा टाकला आहे.
    दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थकेम लॅबोरेटरी कंपनीवर पुणे शहर पोलीसांनी धाड टाकली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात मेफेड्रींन(एम डी) ड्रग सापडले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुणे शहर पोलिसांनी 10 गाड्यांचा ताफा घेऊन MIDC मध्ये छापा टाकलाय. सोमवारी पुण्यात पकडला गेलेला साठा हा कुरकुंभ येथील कंपनीशी निगडीत असल्याचे बोलले जात आहे. कुरकुंभ एमआयडीसी केमिकल झोन असून यापूर्वी देखील अनेकवेळा अशा धाडी टाकण्यात आल्या असून या कंपनीत आणखी किती ड्रग साठा आहे का? याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.

    पुण्यात जप्त करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलो एमडीची किंमत 2 कोटी रुपये आहे. हे पुण्यात पकडलेले एम डी ड्रग्स मुंबईला पाठवण्यात येणार होते. मुंबईतील पॉल आणि ब्राऊन या ड्रग्स पेडलरकडे विक्री या ड्रग्सची विक्री होणार होती. पॉल आणि ब्राऊन हे दोघे ही परदेशी नागरिक आहेत. 2 दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 3 जणांना अटक केली होती. वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख असे या 3 आरोपींची नावे आहेत. यातील माने आणि हैदर यांच्याविरोधात अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा आता पोलीस सखोल तपास करत आहे. त्यासाठी पोलिसांची काही पथकं अनेक ठिकाणी रवाना करण्यात आली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *