बनावट दारु तयार करून विकणारी चार टाळकी जेरबंद,तळेगाव दाभाडे पोलीसांची कामगिरी
- क्राईम
- September 11, 2022
- No Comment
वडगाव मावळ: नाणेकरवाडीच्या (ता. खेड) हद्दीतील बनावट देशी मद्यनिर्मिती व विक्री कारखान्यावर छापा टाकून तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट देशी दारूची विक्री करणारी टोळी केली जेरबंद. दरम्यान याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक स्वाती भरणे यांना नाणेकरवाडीच्या हद्दीत बनावट देशी मद्य तयार केले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला.
हरीश ब्रजेशकुमार चंद्र (वय 24) व राघवेंद्र यशवीर सिंह (वय 20 दोघेही रा. नाणेकरवाडी, ता. खेड) आरोपीस ताब्यात घेऊन बनावट मद्य जप्त करण्यात आले. बनावट मद्य या बाटल्यामध्ये भरून ते पुन्हा सिल करताना त्याचे बूच जसेच्या तसे पुन्हा बसवण्यात येत होती. आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता, एका पत्र्याच्या शेडमध्ये वाह साजीद शेख यांच्या ताब्यातील देशी दारू टँगो पंच 180 मिली क्षमतेचे 25 बॉक्स, देशी दारूचे टँगो पंच 90 मिलीचे 2 बॉक्स असे एकून 27 बॉक्स मिळून आले. आरोपी वाहीद साजीद शेख यास ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता हे बनावट मद्य त्याने सुनील राममूरत बिंद या इसमास विकले असल्याचे सांगितले. त्यानुसार, सदर इसमास नाणेकरवाडी येथून मुद्देमालासह अटक करण्यात आली.
सदरची कारवाई, निरीक्षक सुनील परळे, डी. सी. जानराव, दुय्यम निरीक्षक स्वाती भरणे, डी. बी. सुपे, एन. आर. मुजाळ, ए. पी. बडदे, रवी लोखंडे, स्वप्निल दरेकर, डी. बी. गवारी, रसूल काद्री, शिवाजी गळवे, राहुल जौजाळ, रावसाहेब देवतुळे, गायकवाड, अतुल बारंगळे, समीर पडवळ, गायकवाड, सोलंके या पथकाने केली