• February 19, 2024
  • No Comment

वाघोली पोलीस चौकीसमोर स्वतःला पेटवून घेणाऱ्या तरुणाचा मृत्यू

वाघोली पोलीस चौकीसमोर स्वतःला पेटवून घेणाऱ्या तरुणाचा मृत्यू

    पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत असून, वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करत या तरुणाने काही दिवसांपूर्वी ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून स्वतः ला पेटवून घेतले होते. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असतानाच आज त्याचा मृत्यू झाला आहे. रोहिदास अशोक जाधव (वय 32 वर्ष, रा. वाघोली) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर, 13 फेब्रुवारी रोजी रोहिदासने शहरातील वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतले होते.

    मारहाण करणाऱ्यावर पोलिसांनी काय कारवाई केली, याची चौकशीसाठी आलेल्या रोहिदासला पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत त्याने पोलीस चौकीसमोरच स्वतः ला पेटवून घेतले. ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून त्याने स्वतःला पेटवून घेतलं होतं. त्याने दिलेल्या तक्रारीत पोलिस योग्य ती कारवाई करत नसल्याने पोलिसांचे नाव घेत या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या वाघोली पोलीस चौकीसमोर त्याने स्वतःवर डिझेल टाकून पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज त्याचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला आहे.

    नेमकं काय आहे प्रकरण?

    पुण्यातील लोणी कंद पोलीस ठाणेअंतर्गत येणाऱ्या वाघोली पोलीस चौकीच्याबाहेर रोहिदास जाधव नावाच्या तरुणाने 13 फेब्रुवारी रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांवर आरोप करत त्याने स्वतःवर डिझेल टाकून जाळून घेतलं होतं. या तरुणावर शहरातील सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या घटनेनंतर हॉस्पिटलच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे पोलिसांचे नाव घेत रोहिदास जाधव या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यामध्ये तो 90 टक्के भाजला होता. तेव्हापासून त्याच्यावर उपचार करण्यात येत होते. दरम्यान, सात दिवसांनी उपचार सुरु असतानाच रोहिदास याचा आज मृत्यू झाला आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *