• February 19, 2024
  • No Comment

खराडी भागात धक्कादायक घटना पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

खराडी भागात धक्कादायक घटना पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

    पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील खराडी भागात घडली आहे. महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे

    मात्र, महिला घरात पळून गेल्याने अनर्थ टळला आहे. पार्किंगच्या वादातून हा संपूर्ण प्रकार घडला आहे. १० ते १५ जणांच्या टोळक्याने हा संपूर्ण प्रकार केला असल्याची माहिती समोर आली आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून याप्रकरणी काही जण रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे
    महेश राजे यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश राजे व याप्रकरणी आरोपी हे एकाच परिसरात राहतात. त्या दोघांमध्ये पार्किंग वरून वाद सुरू होता. १७ फेब्रुवारी रोजी त्यांच्यात वाद विकोपाला गेला आणि १३ जणांनी येऊन फिर्यादी यांची एक चारचाकी गाडी फोडून नुकसान केले.हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे त्याठिकाणी असलेल्या एक दुचाकी सुद्धा आरोपींनी पेटवली. फिर्यादी यांची भाडेकरू महिला देखील त्या ठिकाणी असल्यामुळे तिच्या अंगावर आरोपींनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला मात्र महिलेने तेथून पळ काढल्यामुळे अनर्थ टळला आहे. या संपूर्ण प्रकरणी पोलिस तपास करत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *