• February 19, 2024
  • No Comment

पाच लाखांची खंडणी उकळल्या प्रकरणी उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलबंन

पाच लाखांची खंडणी उकळल्या प्रकरणी उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलबंन

    पिंपरी : गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या वडिलांकडून पाच लाखांची खंडणी उकळल्याचे प्रकरण देहूरोडच्या पोलिस उपनिरीक्षकाला भोवले आहे. या उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलबंन करण्यात आले.

    सोहम धोत्रे असे निलंबित केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. उपनिरीक्षक धोत्रे हे देहूरोड पोलिस ठाण्याच्या तपास पथकात कार्यरत होते. किवळे येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्या वडिलांकडून पाच लाखांची खंडणी उकळण्यात आली. या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात पोलिस नाईक हेमंत चंद्रकांत गायकवाड आणि पोलिस शिपाई सचिन श्रीमंत शेजाळ यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. हेमंत गायकवाड आणि सचिन शेजाळ या दोघांची देहूरोड पोलिस ठाण्यात नियुक्ती केली होती. देहूरोड पोलिसांच्या तपास पथकात ते कार्यरत होते. तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सोहम धोत्रे यांचा वचक न राहिल्याने हेमंत गायकवाड आणि सचिन शेजाळ यांनी पोलिस दलाची प्रतिमा मलीन होईल, असे कृत्य केले.

    दरम्यान, देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली. देहूरोडच्या तपास पथकाकडून अवैध धंद्यांना आळा बसवणे आवश्यक होते. मात्र, गुन्हे शाखेने कारवाई केली. या कारणांमुळे पोलिस उपनिरीक्षक सोहम धोत्रे यांना निलंबित करण्यात आले

    Related post

    मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

    मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : मार्केट यार्डमधील फळ, भाजीपाला, केळी, पान तसेच कांदा-बटाटा विभागातील आडत्यांची शिखर संघटना असलेल्या श्री छत्रपती…
    गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने त्रस्त बाजार

    गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पूणे : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत असल्याने नागरिक, व्यापारी आणि शेतकरी यांना मोठ्या…
    महंमदवाडीत टँकरने दुचाकीला दिली धडक; १९ वर्षीय खेळाडू ठार

    महंमदवाडीत टँकरने दुचाकीला दिली धडक; १९ वर्षीय खेळाडू ठार

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे – भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका तरुण फुटबॉलपटूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *