• February 19, 2024
  • No Comment

५० लाखांच्या खंडणीसाठी शाळकरी मुलाचे अपहरण पोलिसांकडून तातडीने तपास करून मुलाची सुटका

५० लाखांच्या खंडणीसाठी शाळकरी मुलाचे अपहरण पोलिसांकडून तातडीने तपास करून मुलाची सुटका

    पुणे : भारती विद्यापीठ परिसरामधून एका शाळकरी मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने तपास करून मुलाची सुटका केली.

    अपहरणकर्ते पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दहा वर्षांच्या मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. याबाबत त्याच्या पालकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मुलाचे अपहरण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर भारती विद्यापीठ आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास सुरू केला.

    पोलीस मागावर असल्याचे समजताच मुलाला सोडून आरोपी पसार झाले. अपहरणाचा गु्न्हा संवेदनशील असून, आरोपींचा माग काढण्यात येत आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *