• February 19, 2024
  • No Comment

पुणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई गुंडाकडून साडेतीन कोटीचे मेफेड्रोन जप्त

पुणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई गुंडाकडून साडेतीन कोटीचे मेफेड्रोन जप्त

    पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करून साडेतीन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. या प्रकरणी सोमवार पेठेतील गुंड वैभव उर्फ पिंट्या माने याच्यासह तिघांना अटक करण्यात आली असून, अमली पदार्थ तस्करीमागे आंतरराष्ट्रीय तस्कर असल्याचा संशय आहे.

    अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आणि साथीदारांकडून ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. गुंड वैभव उर्फ पिंट्या माने आणि त्याचे साथीदार अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त मनोज पवार, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि पथकाने ही कारवाई केली
    पोलीस कर्मचारी विठ्ठल साळुंखे यांनी अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट उघडकीस आणले. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय तस्करांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *