• February 19, 2024
  • No Comment

हवेत कोयते फिरवून रिक्षांची तोडफोड, पाच जणांवर गुन्हा; लोहगाव परिसरातील घटना

हवेत कोयते फिरवून  रिक्षांची तोडफोड, पाच जणांवर गुन्हा; लोहगाव परिसरातील घटना

    पुणे : आरडाओरडा करुन हातातील कोयते हवेत फिरवून रस्त्याच्य कडेला पार्क केलेल्या दोन रिक्षांची तोडफोड करुन नुकसान केले. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करुन एका सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.17) रात्री बाराच्या सुमारास लोहगाव येथील कलवड वस्ती येथील लेन नं. 2 येथे घडला आहे.याबाबत अमोल अनंत कानु (वय-39 रा. लेन नं. 2 कलवड वस्ती, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून करण विजय

    दोरकर (वय-19 रा. पठारे वस्ती, लोहगाव), शाबाद आयुब औटी (वय-18 रा. मुंजाबा वस्ती, धानोरी), यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांवर आयपीसी 504, 427, 34 सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीसकायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर करण दोरकर, शाबाद औटी यांना अटक केली असून करण दोरकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शनिवारी रात्री कलवड वस्ती येथील लेन नं. 2 येथे येऊन जुबेर कुठे आहे अशी विचारणा केली. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा व शिवीगाळ करुन हातातील लोखंडी कोयत नागरिकांकडे पाहून हवेत फिरवले. तसेच कोयत्याने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या दोन रिक्षांच्या समोरील काचा फोडून नुकसान केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तोरडमल करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *