• February 19, 2024
  • No Comment

उधारीवर सिगारेट न दिल्याने चार जणांनी टपरी चालकाला काठीने व दगडाने मारहाण

उधारीवर सिगारेट न दिल्याने चार जणांनी टपरी चालकाला काठीने व दगडाने मारहाण

    पुणे : उधारीवर सिगारेट देण्यास नकार दिल्याने चार जणांनी टपरी चालकाला काठीने व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.16) रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास हडपसर परिसरातील शिंदे वस्ती येथील पावर हाऊस समोर घडला आहे

    याबाबत वसीम युनुस मुजावर (वय-24 रा. शिंदे वस्ती, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन दिवेश चव्हाण, शेखर यादव, राहुल चव्हाण, यश चव्हाण (सर्व रा. गोसावी वस्ती, हडपसर) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन राहुल चव्हाण व यश चव्हाण यांना अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा भाऊ यांची हडपसर येतील शिंदे वस्ती येथील पावर हाऊस समोर पानटपरी आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊ च्या सुमारास आरोपी पानटपरीवर आले. त्यांनी उधारीवर सिगारेट मागितली. मात्र फिर्यादी यांनी उधारीवर सिगारेट देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच बघुन घेण्याची धमकी दिली.

    तसेच फिर्यादी यांना अंधारात डोक्यात दगड व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केली. याबाबत वसीम याने फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक बर्गे करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *