सराईत चोरटा जेरबंद, नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

सराईत चोरटा जेरबंद, नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

चिखली:महिलेची पर्स हिसकावून पळून जाणाऱ्या चोरट्याला शिताफीने पकडून नागरिकांनीच पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना चिंचवड येथे विठ्ठल मंदिराच्या बाजूला शनिवारी (दि.3) रात्री पावणे आठ वाजता घडली.

याप्रकरणी संबंधीत महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अक्षय परमेश्वर लवटे (वय 22, रा.चिखली) याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर, त्याचा साथीदार सुनिल मधुकर अर्जून (वय 25 रा. चिखली) हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीमहिला व त्यांचे पती हे त्यांच्या एका मित्राच्या घरी सत्यनारायणाच्या पुजेसाठी पायी चालले होते. यावेळी त्यांच्या समोरून एक दुचाकी आली, ज्यावर दोघेजण बसले होते. त्यातील पाठीमागे बसलेल्या तरुणाने फिर्यादी यांच्या हातातील पर्स हिसकावली. यावेळी फिर्यादी यांनी ती दुसऱ्या हाताने घट्ट धरली. यावेळी आरोपीने त्याच्या हातात असलेल्या धारदार शस्त्राने फिर्यादीच्या हाताच्या मनगटावर मारले. फिर्यादी जखमी झाल्याने त्यांची पर्स हातून निसटली. पर्समध्ये 5 हजार रुपयांचा मोबाईल, 1 हजार रुपये रोख व 1 हजार रुपयांची पर्स असा एकूण 7 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून आरोपी दुचाकीवरून पळून जाऊ लागले.

यावेळी काही अंतरावर गेल्यानंतर दुचाकी थांबली व त्यातील पाठीमागे बसलेला चोरटा उतरून पळून जाऊ लागला. यावेळी फिर्यादी व त्यांच्या पतीने आरडा-ओरड केल्यानंतर तेथील नागरिकांनी पाठलाग करून चोरट्याला पकडले.

 

चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

Related post

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय तरूणाला १० वर्षे ‘सक्तमजुरी’

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय…

पुणे: बेकायदेशीरपणे घरात घुसून नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व…
महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून २१ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरीला न लावता तसेच रक्कम परत…
थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

पिंपरी: मार्च अखेर जवळ येत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *