पाण्याच्या टँकर खाली चिरडून तरुण कामगार ठार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
- क्राईम
- September 6, 2022
- No Comment
चाकण: कंपनीच्या गेटवर कार्ड पंचिंग करत असलेला तरुण कामगार पाण्याच्या टँकर खाली चिरडून ठार झाल्याची घटना रविवारी (दि. 4 सप्टेंबर) सकाळी सहाच्या सुमारास घडली. चाकण औद्योगिक वसाहतीत खराबवाडी (ता. खेड) येथील कोरस इंडिया कंपनीच्या प्रवेशद्वारावर हा अपघात झाला.
अजिंक्य अशोक चाळक (वय 19, सध्या रा. खराबवाडी, मूळ कळम, जि. उस्मानाबाद) असे या अपघातात ठार झालेल्या तरुण कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पहिल्या पाळीसाठी कामावर आला होता. सकाळी साडेसहाच्या सुमारास कंपनीच्या प्रवेशद्वारावर कार्ड पंचिंग करून कामावर जात असताना कंपनीतून आलेल्या पाण्याच्या टँकर खाली चिरडून तो ठार झाला आहे. यामध्ये आणखी एक जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. महाळुंगे पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु आहे.