- February 2, 2025
- No Comment
मुंढव्यात बारमध्ये हाणामारी, बीअरच्या बाटल्या एकमेकांच्या डोक्यावर फोडल्या!

मुंढवा (पुणे): पुण्यातील मुंढव्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंढवा भागातील बारमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे.
मुंढव्यातील लोकल नावाच्या हॉटेलमध्ये मध्यरात्री दोन ग्रुपमधे राडा झाला. झालेल्रया हाणामारीत एकमेकांच्या डोक्यावर बीअरच्या बाटल्या फोडल्या.
बारमध्ये फ्री स्टाईल हाणामारीनंतर दोन्ही ग्रुप मधे आपसात प्रकरण मिटवून घेतल्याची माहिती मुंढवा पोलिसांनी दिली आहे. रात्री बारमध्ये दोन गटामध्ये काही कारणास्तव वाद झाला. शाब्दिक वाकयुद्ध सुरू असताना वाद आणखी पेटला अन् दोन्ही गटात हाणामारी सुरू झाली. बार कर्मचाऱ्यांनी वाद शमवण्याचा प्रयत्न केला. परंतू वाद चांगलाच चिघळला अन् दोन्ही गटाने हाणामारी केली. यावेळी एकमेकांच्या डोक्यात बियरच्या बाटल्या देखील फोडल्याची माहिती मिळाली आहे.