• February 2, 2025
  • No Comment

वाकडेवाडीतील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; तीन आरोपी गजाआड

वाकडेवाडीतील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; तीन आरोपी गजाआड

पुणे: एलआयसी पॉलिसीच्या नावाखाली नागरिकांना लाखोंचा गंडा घालणार्‍या वाकडेवाडी येथील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करत शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली. आरोपींकडे पुणे परिसरातील नामांकित 35 कंपन्यांचे बनावट रबरी शिक्के मिळून आले असून, 15 मोबाईल, 150 सिम कार्ड आणि वेगवेगळ्या 30 बँकांची बँक खाती, चेकबुक मिळाले आहेत.

हा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

आरोपींनी एलआयसीच्या नावाने बनावट ओळखपत्र तयार केले होते. प्राथमिक तपासात आरोपींनी दोघांची फसवणूक केल्याचे समोर आले असून, त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. शंकर कारकुन पोखरकर (वय 42, रा. कात्रज), मेहफूज मेहबूब सिद्दिकी (वय 40, रा. औंध), आशिष रामदास मानकर (वय 48, वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील पोखरकर हा मुख्य सूत्रधार आहे.

आपण एलआयसी एजंट असल्याचे सांगून जादा परताव्याचा आमिषाने आरोपीने 2021 मध्ये शिवाजीनगर भागातील एकाकडून 5 लाख 4 हजार रुपये उकळले. काही दिवसांनी पैसे मिळतील, असे त्यांना सांगण्यात आले होते.

यादरम्यान खात्री करण्यासाठी फिर्यादीने संपर्क साधला असता आरोपींचा फोन बंद लागला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत संबंधित व्यक्तीने 2023 मध्ये शिवाजीनगर पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. तेव्हापासून शिवाजीनगर पोलिस आरोपींच्या मागावर होते. त्यावरून नागरिकांना संपर्क केला जात होता.

पुढील कामगिरी पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक के. बी. डाबेराव, अंमलदार नलिनी क्षीरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, गणेश जाधवर, रुचिका जमदाडे, स्वालेहा शेख, सरस्वती कांगणे यांच्यासह पथकाने केली.

Related post

पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाला साताऱ्यात ठोकल्या बेड्या

पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाला साताऱ्यात…

पुणे: पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजा याला साताऱ्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. ८ मार्च रोजी सकाळी भर चौकात…
पुण्यातील अहुजा कुटुंबाची कुंडली आली समोर, खंडणीचे गुन्हे; जेलवारीही केली, अवैध व्यवसायात सहभाग

पुण्यातील अहुजा कुटुंबाची कुंडली आली समोर, खंडणीचे गुन्हे; जेलवारीही…

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेतील एका तरुणाने रस्त्याच्या मधोमध आपली आलिशान कार थांबवली आणि सार्वजनिक ठिकाणी…
कोथरूडमध्ये दुचाकीस्वारासह दोघांना बेदम मारहाण, आरोपी अटक साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल

कोथरूडमध्ये दुचाकीस्वारासह दोघांना बेदम मारहाण, आरोपी अटक साथीदाराविरुद्ध गुन्हा…

पुणे: किरकोळ वादातून रिक्षाचालक आणि साथीदारांनी दुचाकीस्वार तरुणासह मित्राला बेदम मारहाण केल्याची घटना कोथरूड भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *