• February 2, 2025
  • No Comment

कात्रज भागात अमली पदार्थ विक्री करणारा जेरबंद,एक लाखांचे चरस जप्त

कात्रज भागात अमली पदार्थ विक्री करणारा जेरबंद,एक लाखांचे चरस जप्त

    कात्रज: अमली पदार्थ विक्री प्रकरणात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. कात्रज भागातील मांगडेवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून चरस, मोबाइल संच, रोकड असा एक लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    शिवलिंग नागनाथ आवटे (वय ३९, रा. शंभू रेसीडन्सी, मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून ९८ ग्रॅम चरस, दोन मोबाइल संच, रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. आवटे पुणे-सातारा रस्त्यावरील मांगडेवाडीत अमली पदार्थ विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे चरस सापडले. आवटेने चरस कोठून आणले, तसेच कोणाला विक्री करणार होता ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

    अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेस इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे आदी पोलिसांनी ही कारवाई केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *