शंभर च्या वर गुन्ह्यांची नोंद असणारा अट्टल गुन्हेगार गजाआड, पुणे गुन्हे शाखा दोनच्या पथकाची उत्तम कामगिरी
- क्राईम
- September 10, 2022
- No Comment
पुणे: पुणे परिसरात एक नाही दोन नाही तर तब्बल 14 घरफोड्या करणारा,पुणे – पिंपरी चिंचवड परिसरात 100 च्या वर गुन्ह्यांची नोंद असणारा चोर राजाला पुणे पोलिसांनी पिस्टल,जिवंत काडतुसे व 42 तोळे सोन्यासह कात्रज येथून अटक केली आहे.ही कारवाई गुन्हे शाखा दोनच्या पथकाने 31 ऑगस्ट रोजी केली आहे.
राजेश ऊर्फ चोर राजा राम पपलु (वय 38 रा. कात्रज) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 24 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुन्हे शाखा दोनच्या पथकाला खबर मिळाली की,चोर राजा हा 31 ऑगस्ट रोजी कात्रज येथे त्याच्या घरी येणार आहे.त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला, मात्र पोलिसांचा सुगावा लागताच त्याने पळ काढला,पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली.पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता चोर राजाने चोरी केलेले 42 तोळे सोने, 4 किलो चांदी, एक पिस्टल, एक रिव्हाल्वर व दोन जिवंत काडतुसे,एक दुचाकी,दोन लोखंडी कटावण्या,दागीन्यांचे वजन करण्यासाठी मशीन असा एकूण 24 लाख 64 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या चोरीत आरोपी एकटा सामील नव्हता तर पुढे तो दागिने कोणाला विकायचा तो सराफ कारागीर अजय वेदपाठक व त्याचा कोणी इतरसाथीदार होता यांचा शोध पोलीस करत आहेत.पुढील आरोपी सापडले असता आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
चोर राजावर डेक्कन पोलीस ठाणे येथे बोकायदा शस्त्र बाळगल्याचा तसेच बंडगार्जन, भारती विद्यापीठ, दत्तवाडी, सिंहगड रोड, वारजे माळवाडी, हडपसर, कोंढवा, वानवडी, सहकारनगर, वित्रामबाग, तसेच सांगली येथे असे मिळून सध्या 14 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या आधीही त्याने पुणे पिंपर-चिंचवड परिसरात केलेल्या 100 हून अधिक गंभीर गुन्ह्यांची पोलिसांकडे नोंद आहे.याची दखल घेत पुढील तपास गुन्हे शाखेतील पोलीस उप निरीक्षक राजेंद्र पाटोळे करत आहेत.