• September 20, 2022
  • No Comment

आता घरबसल्या करा आधार कार्ड मध्ये दुरुस्ती,जन्म तारीख, नाव, पत्ता, यामध्ये करु शकता बदल

आता घरबसल्या करा आधार कार्ड मध्ये दुरुस्ती,जन्म तारीख, नाव, पत्ता, यामध्ये करु शकता बदल

आधार कार्ड आपल्या महत्वाच्या कागदपत्रान पैकी एक.सरकारी योजना असतील किंवा अन्य कोणत्या बाबी अनेक ठिकाणी आधार कार्डाबाबत विचारणा केली जाते.परंतु जर तुमच्या आधार कार्डावर एखादी चूक असेल तर

तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जर त्यात कोणतीही चूक असेल तर ती आता तुम्ही घर बसल्या दुरुस्त करू शकता.

UIDAI नं पत्ता, नाव, जन्मतारीख असे महत्त्वाचे बदल कसे कराल?

आधार कार्डावरचा पत्ता बदलण्यासाठी ची प्रक्रिया: 

सर्वात प्रथम तुम्हाला resident.uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.त्यानंतर Aadhaar Update Section मध्ये देण्यात आलेल्या ‘Request Aadhaar Validation Letter’ वर क्लिक करा. त्यानंतर सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल ओपन होईल.त्यानंतर तुमच्या १२ अंकी आधार कार्डाद्वारे लॉग इन करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे एक लिंक येईल.ओटीपी आणि कॅप्चा टाकून व्हेरिफाय करा. त्यानंतर ‘Proceed to Update Address’ वर क्लिक करून Update Address via Secret Code चा पर्याय निवडावा लागेल. सिक्रेट कोड एन्टर केल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या सबमिट या बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला दिसणारा अपडेच रिक्वेस्ट नंबर सेव्ह करून ठेवा.

जर तुम्हाला आधार कार्डावर नावात काही बदल करायचा असेल तर:

तुम्हाला प्रथम ssup.uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. त्यानंत त्या ठिकाणी असलेल्या प्रोसिड टू अपडेट या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर ओपन झालेल्या पेजवर १२ अंकी आधार कार्ड क्रमांकानं लॉग इन करा. यानंतर स्क्रिनवर देण्यात आलेल्या कॅप्चा टाका आणि त्यानंतर सेंड ओटीपीवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. ओटीपी एन्टर केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. त्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला टाकावी लागेल. या ठिकाणी तुम्हाला नावापासून ईमेल आयडी पर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत.

जर तुम्हाला नावात बदल करायचा असेल तर Name वर क्लिक करा. परंतु यासाठी तुमच्या जवळ एक अन्य आयडीप्रुफ असणं आवश्यक आहे. आयडी प्रुफ म्हणून पॅन कार्ड, लायसन्स, वोटर आयडी, रेशनकार्डाचा वापर करू शकता.

सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक व्हेरिफिकेशन ओटीपी येईल त्यानंतर तो व्हेरिफाय करून सेव्ह चेंजवर क्लिक करा.

अशाच प्रकारे तुम्हाला याच वेबसाईटवरून आपली जन्मतारीखही बदलता येईल.

सर्वप्रथम तुमचा आधार क्रमांक टाकून तो व्हेरिफाय करा. त्यानंतर ओटीपी आणि कॅप्चा कोड टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून Date Of Birth निवडा. त्यानंतर त्यात आवश्यक ते बदल करून घ्या.

दरम्यान, ही प्रोसेस करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आधार कार्डमध्ये सातत्यानं अपडेट करण्याची परवानगी देण्यात आली नाही.

जन्म तारखेबद्दल नियम अतिशय कडक आहेत. ती तुम्ही केवळ एकदाच अपडेट करू शकता.त्या नंतर तुम्ही कोणतेही बदल करू शकणार नाही.

 

 

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *