• February 16, 2024
  • No Comment

पोलिस चौकीत तरुणाने पेटवून घेतल्यानंतर पोलिसांनी घेतली दखल. बांधकाम व्यावासायिक आणि सोसायटीतील चौघांसह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिस चौकीत तरुणाने पेटवून घेतल्यानंतर पोलिसांनी घेतली दखल.  बांधकाम व्यावासायिक आणि सोसायटीतील चौघांसह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    वाघोली पोलिस चौकीत तरुणाने स्वत:ला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी घडली होती. या तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त करणे, जातिवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावासायिक आणि सोसायटीतील चौघांसह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    रोहिदास अशोक जाधव (वय ३३, रा. सिद्धी अपार्टमेंट, वाघोली) या तरुणाने वाघोली पोलिस चौकीसमोर स्वत:ला पेटवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. याबाबत रोहिदासचा भाऊ नाना अशोक जाधव (वय २६, रा. वाघोली)

     

    याने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बांधकाम व्यावसायिक सचिन जाधव (वय ३९, रा. गोकूळ पार्क, वाघोली), गजानन आबनावे, लता गजानन आबनावे, संग्राम गजानन आबनावे (रा. वाघोली) आणि डॉ. पाचारणे यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

     

    या फिर्यादीनुसार, बांधकाम व्यावसायिक आणि आबनावे यांच्याकडून फिर्यादी तरुणासह त्याच्या भावाला सोसायटीमधील पार्किंग, टेरेसचा वापर करण्यास मनाई करण्यात येत होती. तसेच, त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली होती. याबाबत रोहिदास जाधवने वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

     

    याबाबत पोलिसांनी सचिन जाधव याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. परंतु सचिन जाधव आणि आबनावे यांना अटक करण्यात यावी, अशी रोहिदासची मागणी होती. त्यानंतर रोहिदासने मंगळवारी सकाळी वाघोली पोलिस चौकीसमोर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

    या घटनेनंतर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. पेटवून घेतलेल्या रोहिदासची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. या प्रकरणी काही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील करीत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *