• February 16, 2024
  • No Comment

वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे दीड किलो गांजा जप्त केला;दारुभट्ट्या उद्ध्वस्त

वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे दीड किलो गांजा जप्त केला;दारुभट्ट्या उद्ध्वस्त

    पिंपरी : दारू भट्टी तसेच गांजा प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून छापेमारी करण्यात आली. यात चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत काळूस येथे सुरू असलेल्या दारूभट्टीवर गुन्हे शाखा युनिट तीनने छापा मारला. गुन्हे शाखेच्या युनिट पाचने शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या दारूभट्टीवर छापा मारला. तर अंमली पदार्थ विरोधी पथकाने वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सुमारे दीड किलो गांजा जप्त केला.
    काळूस येथील कारवाई प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनमधील पोलिस अंमलदार राजकुमार हणमंते यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पृथ्वीराज उत्तरसिंग राठोड (रा. काळूस, ता. खेड) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड याने काळूस गावात भाम नदीच्या काठावर गावठी दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाली असता गुन्हे शाखा युनिट तीनने दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. आठ हजार लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी राठोड याने कच्चे रसायन वापरून भट्टी लावली होती. पोलिसांनी चार लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.

    पवना नदीच्या काठावर केलेल्या कारवाईमध्ये गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलिस अंमलदार राजकुमार इघारे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित महिलेने गावठी दारू तयार करण्यासाठी हातभट्टी लावली होती. तिने तीन हजार लिटर दारू तयार करण्यासाठी लावलेले तीन लाख ५०० रुपये किमतीचे रसायन पोलिसांनी नष्ट केले. पोलिस आल्याची चाहूल लागताच संशयित महिला पळून गेली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *