• February 16, 2024
  • No Comment

गांजाच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन पोलिसांनीच उकळली 5 लाखांची खंडणी

गांजाच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन पोलिसांनीच उकळली 5 लाखांची खंडणी

पुणे : गांजाच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन देहुरोड पोलिसांनी कॉलेज तरुणाकडे 20 लाखांची मागणी करुन जबरदस्तीने पाच लाख रुपये खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह आठ जणांवर देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन चार जणांना अटक केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ उडाली आहे. हा प्रकार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वाबारा ते 11 फेब्रुवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान सिम्बायोसिस कॉलेज जवळील सेवन कॅफे, मायाज लॉज येथे तसेच गहुंजे स्टेयीयम येथे घडला आहे.

अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शंकर गोरडे, मुन्नास्वामी, देहुरोड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांच्यावर आयपीसी 363, 384, 385, 120(ब), 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वैभवसिंग मनिषकुमार सिंग चौहाण (वय-19 रा. बॉईज हॉस्टेल सिम्बायोसिस कॉलेज किवळे) याने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी चौहान हा तरुण किवळे येथील सिम्बायोसिस कॉलेज कॉलेजमध्ये शिकतो.

तो कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहतो. देहुरोड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अंमलदार आणि इतर आरोपींनी संगनमत

करुन चौहान याच्याकडून पैसे उकळण्याचा कट रचला. त्यानुसार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास कॉलेज जवळील सेवन कॅफे मधून अपहरण केले.

तेथून चौहान याला मायाज लॉज, गहुंजे स्टेडियम आणि तिथून देहुरोड पोलीस ठाण्यात आणले.

चौहान याला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये घालण्याची धमकी दिली.

कारवाई टाळायची असेल तर 20 लाख रुपयांची मागणी केली.

पोलिसांसह इतर आरोपींनी धमकी दिल्याने घाबरलेल्या चौहान याने त्याच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यावर

गुगल पे व नेट बँकींगद्वारे 4 लाख 98 रुपये देण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद केले.

पुढील तपास देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुट पाटील हे करीत आहेत.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *