• February 16, 2024
  • No Comment

पुणे शहरात अल्पवयीन मुलीवर आरोपींनी 15 दिवस डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार

पुणे शहरात अल्पवयीन मुलीवर आरोपींनी 15 दिवस डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार

    शहर अत्याचाराच्या एका घटनेमुळे हादरले आहे. पुण्यात १७ वर्षीय तरुणीला १५ दिवस डांबून ठेवले. त्यानंतर तीन लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. वडिलांच्या आजारपणासाठी तिला उसने पैसे दिले होते. ते पैसे परत न दिल्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. तसेच पैसे वसुलीसाठी 15 दिवस घरात डांबून ठेवत तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला. या प्रकरणात आरोपी आणि त्याची पत्नी सहभागी झाली. या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

     

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलीचे वडील आजारी होते. यामुळे त्या मुलीने आकाश माने आणि त्याची पत्नी पूनम यांच्याकडून उसनवार पैसे घेतले. वडिलांच्या उपचारासाठी ३० हजार रुपये तिने घेतले होते. मात्र काही कारणामुळे फिर्यादी त्यांना पैसे परत देऊ शकली नाही. यामुळे आकाश माने याने तिला एका लॉज वर नेऊन १५ दिवस डांबून ठेवले. त्या ठिकाणी आकाश माने वारंवार तिच्यावर अत्याचार करत होता.

     

    जीवे मारण्याची धमकी, वेशव्याव्यसाय करून पैसे कमवले

    आकाश माने अत्याचार करुन थांबला नाही. त्याने आणि त्याचे पत्नीने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच जबरदस्तीने शरीर विक्रीस भाग पाडले आणि तिला वेशव्याव्यसाय करण्यास भाग पाडून पैसे कमावले. या प्रकरणी पुनम माने (२२) आणि आकाश माने (२४) या दाम्पत्यावर गुन्हा दाखल आहे. पुनम माने हिला पोलिसांनी अटक केली आहे तर आकाश माने फरार आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *