• February 16, 2024
  • No Comment

गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्या पोलीस कोठडीत वाढ

गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्या पोलीस कोठडीत वाढ

    पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्या पोलीस कोठडीत शनिवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी दिले. मोहोळ खून प्रकरणातील आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार, साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, अभिजित मानकर यांच्या कोठडीची मुदत गुरुवारी संपली. त्यानंतर त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले

    मारणे आणि शेलार मुख्य सूत्रधार आहेत. त्यांच्या मोबाइलमधील काॅल रेकाॅर्डिंग तपासायचे आहे. मारणे आणि शेलार यांची अन्य आरोपींसोबत समोरासमोर चौकशी करायची आहे. मारणे आणि शेलारच्या कोठडीत वाढ करण्यात यावी. मोहोळवर गोळ्या झाडणारा आरोपी पोळेकर, कानगुडे, शेळके, गांदले, मानकर यांना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी विनंती तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे आणि विशेष सरकारी वकील ॲड. प्रमोद बोंबटकर यांनी केली. बचाव पक्षाकडून ॲड. राहुल देशमुख, ॲड. केतन कदम, ॲड. दादासाहेब भोईटे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मारणे आणि शेलार यांच्या कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले. अन्य आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. मोहोळचा खून केल्यानंतर गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार पसार झाले होते. दोघांना कोणी मदत केली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *