गणेश विसर्जनासाठी पुणे सज्ज, पहा आपत्कालीन परिस्थितीत साधावयाचे संपर्क
- पुणे
- September 5, 2022
- No Comment
पुणे: विसर्जनासाठी महापालिकेची तयारी पूर्ण झाली असून १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३०३ विसर्जन घाटांवर प्रशासनाने यंत्रणा सज्ज केली आहे. टिळक चौक, टिळक रस्त्यावरील आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, नारायण पेठ येथे माती गणपतीजवळ मंडप टाकण्यात आले आहेत.विसर्जन घाटांवर आणि मिरवणूक मार्गावर औषध फवारणी करण्यात आली आहे.
तसेच घाटावर जीवरक्षक पथक तैनात करण्यात येणार आहे. अग्निशामक दलाच्या वतीने प्रत्येक घाटावर अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. घाटावर, नदी किंवा तलाव येथे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना जलाशयापासून लांब ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणी पाण्यात बुडत असेल, तर त्वरित तेथे उपस्थित असणाऱ्या जीवरक्षकाला त्याची कल्पना द्यावी. क्षमतेचा अंदाज घेऊनच विसर्जनासाठी होडीमध्ये बसावे. जीवरक्षकांकडून गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके, फिरती शौचालये, सूचना फलक या गोष्टी सज्ज करण्यात आल्या आहेत. डेक्कन जिमखाना, नूतन मराठी विद्यालयाजवळ, लक्ष्मी रस्ता या ठिकाणी मिरवणूक संपेपर्यंत स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि वाहनचालक यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. मिरवणुकीत गुलालाचा वापर करू नये. रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंगाची उधळण मिरवणुकीत करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत साधावयाचा संपर्क
२५५०१२६९
२५५०६८००
२५५०६८०१
२५५०६८०२
२५५०६८०३
अग्निशमन दल – १०१
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी – गणेश सोनुने – ९६८९९३१५११
अग्निशमन प्रमुख – देवेंद्र पोटफोडे – ८१०८०७७७७९
माहिती व जनसंपर्क अधिकारी – योगेश हेंद्रे – ९९२२४०४०९९
या क्रमांकावर नागरिकांना मदतीसाठी संपर्क साधता येणार आहे.