• October 17, 2023
  • No Comment

चेष्टा मस्करीतून सुरु झालेल्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तिघांवर चाकूने वार; लोहियानगरातील घटना

    पुणे : चेष्टा मस्करीतून सुरु झालेल्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तिघांवर एकाने चाकुने वार केला. ही घटना लोहियानगर भागात घडली. याप्रकरणी खडक पोलिसांनी आफ्रिदी अरिफ सय्यद (वय २३) याला अटक केली आहे. याबाबत शहजाद खुर्शीद अली सय्यद (वय २९, रा. सूर्यकिरण मंडळाजवळ, लोहियानगर, गंज पेठ) याने फिर्याद दिली.

    अधिक माहितीनुसार, आफ्रिदी हा शहजादच्या ओळखीचा आहे. दोघे एकाच भागात राहायला आहेत. आफ्रिदी आणि मुजीब खान यांच्यात चेष्टा मस्करी करण्यावरून भांडणे सुरू झाली. त्यावेळी शहजादने त्यांची भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. आफ्रिदीने त्याला शिवीगाळ करुन चाकू उगारला. शहजादवर वार केला असता त्याने ते हुकविला. त्यावेळी शहजादचा लहान भाऊ आफताबने आरोपी आफ्रिदीला जाब विचारला. आफ्रिदीने आफताबच्या पोटावर चाकुने वार केले. तेथे थांबलेल्या शहजादचा लहान भाऊ उबेद मदतीसाठी धावला. आफ्रिदीने उबेदवर चाकुने वार केला. आफ्रिदीने केलेल्या हल्ल्यात शहजाद, त्याचे भाऊ आफताब, उबेद जखमी झाले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत काळे तपास करत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *