• October 17, 2023
  • No Comment

पुण्यातील कंपनीची 35 लाखांची फसवणूक नाशिक येथील दोघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यातील कंपनीची 35 लाखांची फसवणूक नाशिक येथील दोघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल

    पुणे : वेगवेगळ्या ठिकाणी स्पेअरपार्टची दुकाने असल्याचे सांगून पुण्यातील कंपनीकडून 35 लाखांचा माल खरेदी केला. मात्र, खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक येथील दोघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
    प्रविण बजाज व अतुल लांजेवार (दोघे रा. नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सोमाणी पियोजीओ स्पेअरपार्ट एजन्सी कंपनीचे कर्मचारी संदीप भिमराव घुले (वय-36 रा. मांजरी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 11 फेब्रुवारी 2023 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत कंपनीच्या वडकी येथील गोडावुन मध्ये घडला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी नाशिक, भुसावळ, तळोदा, मनमाड या ठिकाणी वेगवेगळ्या नावाची स्पेअरपार्टसची दुकाने असल्याचे सांगितले. दुकानांच्या नावाने फिर्यादी यांच्या कंपनीला मालाची ऑर्डर देऊन माल ताब्यात घेतला. मात्र, मालाचे पैसे न देता आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांच्या कंपनीची 34 लाख 65 हजार 289 रुपयांची फसवणूक केली. तसेच विश्वासाने दिलेल्या मालाचा अपहार केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *