- October 17, 2023
- No Comment
अट्टल गुन्हेगार आझम शेख याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : खुनाचा प्रयत्न, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे करुन खडक परिसरात दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार आझम शेख याच्याविरुद्ध पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 49 वी कारवाई आहे
आझम इक्बाल शेख (वय-25 रा. भवानी पेठ, चुडामन तालीम समोर, पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत जीवघेण्या हत्यारांसह फिरताना खुनाचा प्रयत्न, खंडणी, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगा करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत.
आझम शेख याच्या विरोधात मागील पाच वर्षात 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई
करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन
पोलीस आयुक्तांनी आरोपीला एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत अमरावती मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने, पोलीस उपनिरीक्षक अतुल बनकर व पी.सी.बी. गुन्हे शाखा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.टी. खोबरे, पोलीस उपनिरीक्षक राजु बहिरट यांनी केली.
पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत 49 गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई केली जाणार
असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे




