• October 17, 2023
  • No Comment

शादी डॉट कॉम वर ओळख झाल्यानंतर शरीरसंबंध त्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन पुण्यातील तरुणीची फसवणूक

शादी डॉट कॉम वर ओळख झाल्यानंतर शरीरसंबंध त्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन पुण्यातील तरुणीची फसवणूक

    पुणे : शादी डॉट कॉम या वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून सोन्याचे दागिने घेऊन तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केली. या प्रकरणी एका तरुणावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
    लखन महादेव भिसे (रा. इंदापुर रोड, पिंपळी, ता. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत टिळक रोड येथे राहणाऱ्या 25 वर्षाच्या तरुणीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जुलै 2022 ते मार्च 2023 या कालावधीत पुण्यात घडला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर ओळख झाली. आरोपीने त्याचा खोटा बायोडाटा पाठवून तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवले. तिला पुण्यातील एका लॉजवर नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने वेगवेगळी कारणे सांगून तरुणीकडून रोख स्वरुपात पैसे व सोन्याचे दागिने घेऊन 8 लाख 3 हजार 738 रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर फिर्यादी तरुणीने आरोपीकडे लग्न करण्याची मागणी केली असता तो टाळाटाळ करू लागला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात संबंधित तरुणीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. खडक पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खडक पोलीस करत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *