• October 1, 2022
  • No Comment

चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपी जेरबंद

चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपी जेरबंद

    राजगड: पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून एका आरोपीला अटक केली आहे.

    संदीप कौधर (वय 40 वर्षे, रा. दादा शिंदे यांच्या भाड्याच्या खोलीत चिलाडी फाटा, तालुका भोर, जिल्हा पुणे) या आरोपीस अटक करण्यात आले आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फरारी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार अजय घुले यांना गोपनीय बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक मदतीने राजगड पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम 380 अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित इसम हा कापूरहोळ येथील अमृता हॉटेल येथे असल्याची माहिती मिळाली.

    मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव संदीप कवधर असे सांगितले. त्याच्याकडे या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता, तो गुन्हा त्यानेच केला असल्याची कबुलीही दिली. या अनुषंगाने आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी राजगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

    सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक, धनंजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पोलीस हवालदार सचिन घाडगे, पोलीस हवालदार अजित भुजबळ, पोलीस हवालदार विजय कांचन व पोलीस हवालदार अजय घुले यांनी केली आहे.

    Related post

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…
    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी दुर्घटना टळली रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी…

    लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कृष्णा लॉजजवळील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.१७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *