• October 1, 2022
  • No Comment

तडीपारीचा आदेश भंग करून शहरात आलेला सर्राइत जेरबंद

तडीपारीचा आदेश भंग करून शहरात आलेला सर्राइत जेरबंद

    देहू: तडीपारीचा आदेश भंग करून शहरात आलेल्या आरोपीस देहू रोड पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी चाकू हातात घेऊन मोठ्याने ओरडून तेथील लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

    कुणाल वाल्मिकी वय 26 वर्षे रा. श्रीकृष्ण नगर, एमबी कॅम्प, देहूरोड ह्या आरोपीस 28 सप्टेंबरला दुपारी 3.30 वा चे सुमारास अटक करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 142, भारतीय शस्त्र कायदा 4(25), क्रिमिनल लॉ ऍक्ट 7 प्रमाणे देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीस उप-आयुक्त परिमंडल दोन, पिंपरी चिंचवड यांनी 30 जुलैला महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 (1) (अ) (ब) प्रमाणे पुणे जिल्ह्यातील हद्दीतून दोन वर्ष कालावधी करिता 3 ऑगस्ट 2022 ते 2 ऑगस्ट 2024 झाले असतानाही त्याने न्यायालयाची किंवा पोलीस उप-आयुक्त, परिमंडल दोन यांची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता प्रतिबंधित क्षेत्रात शिंदे पेट्रोल पंपा समोरील सार्वजनिक रोड वर चाकू हातात घेऊन मोठ्याने ओरडून तेथील लोकांमध्ये दहशत निर्माण करताना दिसला.

    Related post

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…
    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी दुर्घटना टळली रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी…

    लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कृष्णा लॉजजवळील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.१७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *