- October 1, 2022
- No Comment
रेल्वेच्या धडकेत आई व मुलाचा मृत्यू
कामशेत: कामशेत रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेच्या धडकेत आई व मुलगा ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 11:30 वा च्या सुमारास घडली आहे. गोदावरी देवाडे, वय 28 वर्षे व ओम देवाडे, वय 6 वर्षे, दोघे राहणार कामशेत असे अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.
लोणावळा रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामशेत मधील रहिवासी गोदावरी देवाडे या त्यांच्या तीन मुलांना सोबत घेऊन इंद्रायणी नदीवरील घाटावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. हा घाट लोहमार्गाच्या पलीकडे इंद्रायणी नदी काठावर आहे. नदीवर कपडे धुतल्यानंतर त्या त्यांच्या तीन मुलांच्या सोबत परत घरी येत होत्या.
त्यातील मुलगा वय 4 वर्षे व मुलगी वय दीड वर्षे यांना प्लाटफोर्म वर उचलून ठेवले व तिसर्या मुलास प्लाटफोर्म वर ठेवत असताना कोइम्बतूर कुर्ला गाडी ची धडक लागून त्यांचा व मुलाचा जागीच मृत्यू झाला.लोणावळा रेल्वे पोलिसांनी सांगितले की, कामशेत रेल्वे स्थानकाजवळ लोहमार्ग पादचारी पुलाची व्यवस्था आहे. लोकांनी त्या पदचारी पुलाचा लोहमार्ग सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी उपयोग केला पाहिजे. पण काही लोक वेळ वाचवण्यासाठी लोहमार्ग पायी ओलांडण्याचा प्रयत्न करतात जे त्यांच्यासाठी घातक आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी लोकांनी पादचारी पुलाचा वापर करावा.