- October 1, 2022
- No Comment
पेट्रोलपंपावर दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद, चाकण पोलिसांची कामगिरी
चाकण: म्हाळुंगे येथील कुरूळी गावच्या हद्दीतील एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकायच्या तयारीत असणाऱ्या टोळीला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.
रोहन मोहन शिंदे (वय 21 रा.चाकण), बालाजी संभाजी फत्तेपुर (वय 19 रा.आंबेठाण, मुळ उस्मानाबाद) व संदेश दत्ता जगताप (वय 19 रा.आंबेठाण, मुळ उस्मानाबाद) अशी अटक आरोपींची नावे असून त्यांचे साथीदार सनी व बबलु हे फरार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी गावातील मुंगी कंपनी ते कुरुळीगावठाण या मार्गावरील एच.पी पेट्रोलपंपावरील कामगार रात्री दिवसभराची रोकड घेऊन जातो. याची पूर्ण माहिती काढून त्याच्यावर पाळत ठेऊन दरोडा घालण्याच्या तयारीत ही टोळी होती. त्या आधीच पोलिसांना त्यांच्या हालचालीची खबर लागली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून त्यांना अटक केले. यावेळी आरोपींकडून पोलिसांनी लोखंडी कोयता, मिरचीपूड, लोखंडी रॉड, लोखंडी कटावणी, दोन मोबाईल असे एकूण 17 हजार 895 रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोन आरोपी फरार झाले. त्याचा तपास चाकण पोलीस घेत आहे.