- October 1, 2022
- No Comment
धक्कादायक! मुलानेच केला आईला ठार मारण्याचा प्रयत्न

लोणी काळभोर: पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे एका तरुणाने स्वतःच्याच आईवर चाकूने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला.
लोणी काळभोर परिसरातील कदम वाक वस्तीत हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अभिजीत गोपीचंद दरेकर (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे याप्रकरणी त्याची आई सिंधू गोपीचंद दरेकर (वय 50) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजीत याला प्रचंड दारू पिण्याचे व्यसन होते. काहीही कामधंदा न करता तो सतत दारू प्यायचा. बुधवारी सायंकाळी तो घरी आला यावेळी घरात आई आणि त्याची पत्नी होती. यावेळी त्यांनी पत्नी मनीषा तिला शिवीगाळ केली आणि चाकू घेऊन थेट आईच्या डोक्यात वार केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.





